जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद महत्वाचे. अमोल वालझाडे पोलिस निरीक्षक. आई वडील, गुरुजन व जेष्ठ नागरिक बंधूंचे आशीर्वाद फार महत्वाचे असून त्यांच्या आशीर्वादाने आपण समाजात उत्तम कामगिरी करून शहराचे नाव गाजवू असे प्रतिपादन ठाणे गुन्हे शोध पथक पोलिस निरीक्षक व भगूर पुत्र अमोल वालझाडे यांनी केले. भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाल्याबद्दल आज त्यांच्या निवासस्थानी गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष खंडेराव गायकवाड हे होते, प्रास्ताविक प्रशांत कापसे यांनी करताना सांगितले की अमोल ने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन हे यश संपादन केले, स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समितीस अभिमान आहे, या प्रसंगी दादासाहेब देशमुख, दिलीप चव्हाण, मारुतीराव कोरडे अंबादास पाटील, बेदरकर सर, नारायण आडके, रमापती चौहान, बबनराव आडके, मोहन खैरनार आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार प्रशांत कापसे यांनी मानले