भगूर येथे श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी उत्साहात साजरी
तेराव्या शतका तेर येथे जन्मलेले संत गोरोबा कुंभार हे साध्या कुंभार कुटुंबात वाढले. मातीची मडकी बनविणे हा त्यांचा व्यवसाय. पण त्या माती सोबतच त्यांनी आपले जीवनही विठ्ठल भक्तीत घडविले. संसार सांभाळत त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला. हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य असे ह भ प श्री रकटे महाराज यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले. भगूर येथील कुंभार गल्लीमध्ये श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम त्यानिमित्ताने श्रीरामपूरचे समाज प्रबोधनकार तथा युवा कीर्तनकार ह भ प चंद्रकांत महाराज रकटे यांचे सुसाव्य संत गोरोबाकाका यांच्या चरित्रावर कीर्तन झाले. कीर्तनात त्यांना साथ देण्यासाठी ह भ प स्वप्नील महाराज आहेर संदीप महाराज लोकरे कन्हैया महाराज श्री ललितजी भदे बाळासाहेब शिंदे बबनराव आडके मृदुंग वादक रवी महाराज बोराडे व अमेय सोनवणे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. प्रथम महाराजांच्या हस्ते संत गोरोबा काकांची हार पुष्प घालून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर आयोजकांच्या वतीने ठेवलेला महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाकरिता भागवत सोनवणे विक्रम सोनवणे संजय सोनवणे वसंत सोनवणे प्रकाश सोनवणे संतोष सोनवणे भास्कर सोनवणे हरी सोनवणे हरीश सोनवणे बाळासाहेब सोनवणे राजेंद्र सोनवणे गणेश सोनवणे विशाल सोनवणे अमेय सोनवणे कचरू मते विष्णू सोनवणे श्री संदीप शेटे महाले सर प्रवीण वायकर आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी भगूर पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव व मित्रपरिवार उपस्थित होते