महापालिकेच्या वतीने "महात्मा ज्योतीबा फुले" यांना अभिवादन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/04/2026 7:33 PM

नांदेड :- स्त्री शिक्षणाचे जनक आणि थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने दि.११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता शहरातील औद्यागिक प्रशिक्षण केंद्राजवळील
"महात्मा ज्योतीबा फुले" यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी *उपमहापौर दिलकसिंग रावत* आणि *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी सुद्धा ज्योतिबांना अभिवादन केले.

याप्रसंगी *महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण*, भोकर मतदासंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण, माहिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. "महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडी करून समाजात समतेचा विचार रुजवला. त्यांचे विचार समाजाला आजही दिशा देणारे आहेत" असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या अभिवादन कार्यक्रमास पालिकेतील नगरसेवक, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.

Share

Other News

ताज्या बातम्या