शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांनी अवैध प्रवाशी वाहतूक, विना वाहन परवाना चालणारी वाहने, अनधिकृत फळ गाडे, हातगाडे व इतर यांचेवर धडक कारवाई करून केल्या 394 केसेस

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/04/2026 7:30 PM

नांदेड :- मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी शहरात वाढत असलेली ट्राफिक समस्या अटोक्यात आणनेसाठी शहरात चालणारी अवैध प्रवाशी वाहतूक तसेच विना परवाना/परमिट चालणारे वाहणे, भरधाव वेगाने चालणारी वाहने, फटाका बुलेट, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणारे, रस्त्यावर लागलेले अनधिकृत फळांचे हातगाडे व वाहने, यांचेवरती कार्यवाही करण्याची मोहीम राबविणे बाबत शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांना आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने दिनांक 10.04.2026 रोजी श्री जगन पवार, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, इतवारा व स्टाफ यांचे समवेत जुना मोंढा, हबीब टॉकीज, बर्की चौक या ठिकाणी वाहणाची कागदपत्रे तपासणी केली. सोबतच ऑटो चालकांना गणवेश परिधान करणेबाबत सुचना दिल्या. वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे वाहनांवर, ट्रिपल सिट वाहने, परवाना नसलेले वाहने, रस्त्यावर लागलेले अनधिकृत फळांचे हातगाडे, वाहने व इतर यांचेवर कार्यवाही करुन एकुन 42 केसेस करून 46,500/- रूपयाचा दंड आकारण्यात आला.

तसेच श्री भागवत नागरगोजे, सहायक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, वजिराबाद व स्टाफ यांचे समवेत रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदीर, वर्कशॉप, राजकॉर्नर व छत्रपती चौक या ठिकाणी वाहणाची कागदपत्रे तपासणी केली. सोबतच ऑटो चालकांना गणवेश परिधान करणेबाबत सुचना दिल्या. वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे वाहनांवर, ट्रिपल सिट वाहने, परवाना नसलेले वाहने, रस्त्यावर लागलेले अनधिकृत फळांचे हातगाडे, वाहने व इतर यांचेवर कार्यवाही करुन एकुन 352 केसेस करून 4,01900/- रूपयाचा दंड आकारण्यात आला. अशा एकुन 394 केसेस करून 4,48,400/- रूपयाचा दंड आकारण्यात आला.

वाढत असलेल्या ट्राफीक मुळे लोकांनी त्यांची चार चाकी/दोन चाकी वाहने कुठेही पार्क न करता पार्कीगचे ठिकाणी पार्क करावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल या प्रकारे कोणतेही फळ गाडे व इतर असे रस्त्यामध्ये लावुन अतिक्रमन करू नये, सिग्नलचे पालन करावे व वाहतुकीस अडथळा होईल अशी कोणतीही कृती करू नये व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा मोटार वाहन कायदा व इतर कायद्यान्वये कडक कार्यवाही करण्यात येईल बाबत पोलीस प्रशासनाचे वतिने आवाहन करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली अधीकारी / अंमलदार शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या