स्वामी विवेकानंद केंद्राची मेघा पाटील गेट मध्ये देशात ५३ वी

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 28/03/2026 2:10 PM

स्वामी विवेकानंद केंद्राची मेघा पाटील गेट मध्ये देशात ५३ वी 
नाशिक येथील विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती , शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्यवाह सचिन शिवराम पाटील यांची सुकन्या तथा कॉलेज ऑफ फार्मसी ची विद्यार्थिनी मेघा सविता सचिन पाटील हिने गेट २०२६ परीक्षेत राष्ट्रीय क्रमवारीमध्ये ५३वा क्रमांक मिळवित राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट) ही देशातील प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून, अभियांत्रिकी व विज्ञान शाखांतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन करून उच्च शिक्षण व संशोधन तसेच काही सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यासाठी ही परीक्षा महत्वाची मानली जाते.बायोटेक्नोलॉजी शाखेत अंतिम वर्षातील मेघा सविता सचिन पाटील हिने ७५५ गुणांसह संपुर्ण भारतात ५३वा क्रमांक मिळवत सर्वोच्च यश संपादन केले. मेघाने विवेकानंद केंद्राच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय राहून हे तिचे अभूतपूर्व यश सर्व तरुणांना प्रेरक ठरले आहे.
या यशाबद्दल शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे अध्यक्ष डॉ कारभारी गांगुर्डे, उपाध्यक्ष डॉ मधुकर आचार्य, विश्वस्त मोहन लाहोटी, सतिश कुलकर्णी, संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे, उपकार्याध्यक्ष अनंतराव अथणी, संस्थेचे पदाधिकारी डॉ भगवान देशमुख, सहकार्यवाह जितेंद्र भावसार, खजिनदार अनिल कवडे, हेमांगी पाटील,भगवान कटारिया, प्रा. डॉ मृत्युंजय कापसे, गणेश चव्हाण, तसेच विवेकानंद केंद्राच्या जिल्हा पदाधिकारी आदींनी तिचे अभिनंदन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या