राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व जगतज्योती संत बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा मनपा सभागृहात प्रस्थापित

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/03/2026 9:26 PM

भारतीय इतिहासातील तीन महान विभूती –राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व जगत्ज्योती संत बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा आज सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सभागृहात प्रस्थापित करण्यात आल्या. या तिन्ही व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्यातून प्रशासन, समता व सामाजिक न्याय या क्षेत्रात आदर्श निर्माण केले.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या उत्तम प्रशासक व राज्यकर्त्या म्हणूनही अजरामर आहेत. माळवा प्रांताच्या कारभारात त्यांनी अत्यंत सक्षम प्रशासन उभारले. त्यांनी संपूर्ण भारतात अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा बांधल्या; शिवाय पाणीपुरवठा व्यवस्था, न्यायव्यवस्था, शेती सुधारणा आणि व्यापार वाहतुकीची व्यवस्था अत्यंत कार्यक्षमतेने चालवली. त्यांच्या कारकिर्दीत जनतेला सुरक्षितता, स्थिरता व समृद्धी लाभली.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक समता, शिक्षणप्रसार आणि शासकीय प्रशासन या तिन्ही क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले. कोल्हापूर संस्थानचे प्रशासन त्यांनी न्याय, सर्वसमावेशकता व पारदर्शकता या तत्त्वांवर उभे केले. मागासवर्गीय बांधवांसाठी आरक्षणाची सुरुवात करून त्यांनी सामाजिक न्यायाचा पाया रचला. जातीय भेदभाव विरोधात ठाम भूमिका घेतली. त्यांची शासनपद्धती ही आजच्या लोकशाहीच्या आदर्शांची प्रेरणा आहे.

जगत्ज्योती संत बसवेश्वर महाराज हे समतेचे अग्रदूत, लिंगायत धर्माचे प्रणेते आणि वचन साहित्याचे शिल्पकार होते. महाराष्ट्रात त्यांचे विचार ‘कायकाच राजा, ज्ञानाचे मंत्री’ या संदेशाने ओळखले जातात.सामाजिक समता, महिला सन्मान आणि श्रमाची प्रतिष्ठा या विचारांनी समाज जोडण्याचे कार्य त्यांनी केले.

या तिन्ही व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमा महानगरपालिकेच्या सभागृहात लावण्यासाठी मी दि.23/3/26 रोजी पत्राद्वारे हा विषय प्रशासनास मांडला होता. त्यानुसार आज महासभेच्या अधिवेशनात महापौर मा धीरज सूर्यवंशी, आयुक्त सत्यम गांधीसो व उपमहापौर मा गजानन मगदूम यांच्या उपस्थितीत या प्रतिमा सभागृहात वैयक्तिक सुपूर्द केल्या.

यावेळी माझ्यासोबत आमचे गटनेते मैनूद्दीन बागवान, विष्णू माने,युवराज गायकवाड, नसीमा ताई नाईक, साक्षीताई बोरगावे, प्रार्थनाताई शिंदे आणि इतर सहकारी नगरसेवक उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हे कार्य सुसूत्रतेने पार पडले.
या कार्यासाठी माझ्या प्रभागातील नागरिक आणि संपूर्ण समाजबांधव यांनी दिलेले पाठबळ लाभले. सर्वांच्या शुभेच्छा व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!

*नगरसेवक अभिजित भोसले
सा मि कु मनपा 

Share

Other News

ताज्या बातम्या