नागरिकांनी पेट्रोल-डिझेलचा अतिरिक्त साठा टाळावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/03/2026 8:14 PM

नांदेड :- जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल व डिझेलची पॅनिक खरेदी करू नये तसेच अतिरिक्त साठा करणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपधारकांची बैठक पार पडली.

या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड तसेच विविध पेट्रोलपंप मालक उपस्थित होते. यावेळी पेट्रोलपंपधारकांनी मांडलेल्या अडचणींचे निराकरण करण्यात आले.

जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला पेट्रोल व डिझेलचा साठा पर्याप्त प्रमाणात राखण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच कोणत्याही परिस्थितीत साठाबाजी किंवा चढ्या दराने विक्री होणार नाही, याबाबत कडक सूचना देण्यात आल्या.

पेट्रोलपंपधारकांच्या सूचनेनुसार रविवारी तेल डेपो सुरू ठेवणे तसेच मागणीनुसार इंधन उपलब्ध करून देण्याबाबत तेल कंपन्यांना सूचना करण्यात आल्या. पेट्रोलपंपांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील उपलब्ध साठ्याचा आढावा घेतला असता, दैनंदिन गरजेनुसार पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या