नांदेड पोलिसांची ठोस पावले : दामिनी पथकाकडून शाळा-कॉलेज परिसरात विशेष मोहीम

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 26/03/2026 6:42 PM

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

त्या अनुषंगाने, नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या शहर व इतवारा दामिनी पथकाने शहर व परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच कोणत्याही प्रकारचा त्रास, छेडछाड किंवा गैरवर्तन झाल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान सार्वजनिक ठिकाणी उभे राहून टवाळक्या करणारे व विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या टुकार प्रवृत्तीच्या मुलांवर शहर दामिनी पथक, इतवारा दामिनी पथकाकडून शहरात माहे जानेवारी ते माहे मार्च 2026 दरम्यान एकुण 251 केसेस महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे तसेच 19 केसेस मोटार वाहन कायदा प्रमाणे कारवाई करुन एकुण 35,500/- रु.चा दंड आकारण्यात आला आहे.

अशा प्रकारच्या कृत्यांना आळा बसावा यासाठी शहरातील 50 पेक्षा अधिक शाळा, कॉलेज्स, कोचिंग क्लासेस, लॉजेस यांची चेकींग करण्यात येत आहे पुढील काळातही अशा कारवाया सातत्याने राबविण्यात येणार आहेत. सदरची कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल कटिबद्ध आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली, छेडछाड किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटनांची माहिती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी. पोलीस प्रशासन आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या