नांदेड पोलीस प्रशासनाची धडक कारवाई;84 फटाका सायलेंसर जप्त व नष्ट

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/03/2026 8:56 PM

नांदेड :- नांदेड शहरामध्ये काही दुचाकी चालकांकडून कंपनीने मान्य न केलेले (अनधिकृत) सायलेंसर बसवून मोठ्या आवाजात "फटाका सायलेंसर" लावून रस्त्याने हुल्लडबाजी करत असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकारामुळे नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता.

याबाबत नांदेड पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान एकूण ८४ मोटरसायकलींवर अनधिकृत बदल केलेले सायलेंसर आढळून आले. संबंधित वाहनांची तपासणी करून कंपनीने मान्य न केलेले ८४ सायलेंसर जप्त करुन सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर जप्त केलेले सायलेंसर हे नियमाप्रमाणे आज दिनांक 24.03.2026 रोजी चे 16.00 ते 16.30 वाजताचे दरम्यान महावीर चौक, नांदेड येथे रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले आहेत.

अनधिकृत सायलेंसर लावून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या संबंधित वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, भविष्यातही अशी मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या वाहनांमध्ये कंपनीने दिलेल्या मानकांनुसारच सायलेंसर वापरावेत व कायद्याचे पालन करावे, असे आवाहन नांदेड पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरज यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामेश्वर वेंजने, श्री श्याम पानेगांवकर, पो नि श्री उदय खंडराय, स्थानिक गुन्हे शाखा, पो नि श्री परमेश्वर कदम पोस्टे वजिराबाद व शहर वाहतुक शाखेचे स पो नि श्री भागवत नागरगोजे शहर वाहतूक शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.

Share

Other News

ताज्या बातम्या