शिवजयंती दिनी सातारा झाला शिवमय जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रेत 12 हजारांहून अधिक सहभागी

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 20/02/2026 2:03 PM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

टाळ मृदुंग, लेझीम, ढोल, ताशांनी वाढविली रंगत मर्दानी खेळ, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे यांच्या वेशभूषेतील व्यक्तीरेखा ठरल्या आकर्षण

जय शिवाजी जय भवानीच्या गजराने आसमंत दुमदुमला

सातारा दि. : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा टाळ मृदुंगाच्या गजरात, पोवाडे, लेझीम, ढोल, ताशे, घोडे, छत्रपती शिवाजी आणि मावळे यांच्या वेशातील विद्यार्थी, वासुदेव, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यांच्या साथीने आज सातारा नगरीत उत्साहात आणि शिवमय वातावरणात संपन्न झाली. रांगोळ्यांनी तसेच ठिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कमानी, रंगीबेरंगी पताका, विद्युत रोषणाई यांनी सजलेल्या राजपथावरुन 12 हजारांहून अधिक शिवभक्त-शिवप्रेमी सहभागी झाले. गांधी मैदान येथून मार्गस्थ झालेल्या या मेगा पदयात्रेची सांगता शिवतिर्थ पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पोलीस बॅन्ड पथकाच्या मानवंदनेने झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन व पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, माय भारत युवा कार्यक्रमाचे राज्य निदेशक कालीदास घाटवळ, माय भारतचे क्षेत्रीय अधिकारी अजय शिंदे, जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व हजारोंच्या संख्येने विविध शाळेचे विद्यार्थी व शिवप्रेमी नागरिक उत्सुर्तपणे सहभागी झाले होते

Share

Other News

ताज्या बातम्या