नरेंद्र–देवेंद्र महोत्सवात हास्याचा धमाका, काव्याची सुरेल मैफल

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/02/2026 5:07 PM

नांदेड : सांस्कृतिक रंगत, हास्याची उधळण आणि काव्याची मैफल अशा बहारदार कार्यक्रमांनी सजलेला “कुबेरनगरी मौजे लोंढेसांगवी प्रस्तुत नरेंद्र–देवेंद्र महोत्सव २०२६” येत्या २१ व २२ फेब्रुवारी रोजी चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान येथे रंगणार आहे. नांदेडकरांसाठी मनोरंजनासोबतच 25 पैठणी साड्या,10 कलर टीव्ही, 2 होम थेटर अशा बक्षीसांचा वर्षाव होणार असून पूर्ण कार्यक्रमात न हसणाऱ्यांना प्रत्येकांना पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी आणि संयोजक ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.

शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी आयोजित चौदाव्या मराठी हास्य दरबारात रसिकांना खळखळून हसवणारे नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. स्टँडअप कॉमेडीचे बादशहा बंडा जोशी, झी हास्य सम्राट फेम सिद्धार्थ खिल्लारे आणि शाहीर रमेश गिरी आपल्या खास शैलीतून रंगत आणणार आहेत.‘चला हवा येऊ दे’ फेम सतीश कासेवार यांच्या सूत्रसंचालनाखाली महिलांसाठी “होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” हा खास उपक्रम पार पडणार आहे. या स्पर्धेत सहभागी महिलांना लालपोतू कलेक्शन तर्फे २५ पैठणी व ऑरगंज्या साड्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहेत. वेळेवर उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी भाजपा कामगार आघाडीच्या वतीने सुरेश लोट यांच्या तर्फे १० कलर टीव्हींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी महोत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. “नांदेड भूषण” पुरस्काराने रमेश पारसेवार, ॲड. गजानन पिंपरखेडे, रत्नाकर वाघमारे आणि गंगाप्रसाद तोष्णीवाल यांचा सत्कार होईल. तसेच “सुधाकर पत्रभूषण” पुरस्काराने पन्नालाल शर्मा, अभय कुळकजाईकर, चारुदत्त चौधरी, संतोष पांडागळे आणि रामेश्वर काकडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, हळद संशोधन केंद्र अध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे, आमदार डॉ. तुषार राठोड (मुखेड), भीमराव केराम (किनवट), राजेश पवार (नायगाव), जितेश अंतापुरकर (देगलूर), बालाजीराव कल्याणकर (नांदेड उत्तर), आनंदराव बोंढारकर (नांदेड दक्षिण), बाबुराव कदम (हदगाव) यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना काहली, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जत्थेदार संत बाबा बलविंदरसिंघ, भाजपा महानगराध्यक्ष अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, मार्केट कमेटी सभापती संजय लहानकर,निवासी उप जिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दै. प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, कुबेर नगरीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश सुगनचंद शर्मा, भगवती हॉस्पिटलचे डॉ. अंकुश देवसरकर, भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट, भाजपा दक्षिण विधानसभा प्रमुख डॉ. सचिन उमरेकर, प्रतिष्ठित व्यापारी अंबादास लालपोतू,उद्योजक मारोतराव कंठेवाड आदींचाही सहभाग राहणार आहे.

रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी चोवीसावे अखिल भारतीय विराट कविसंमेलन रंगणार असून देशभरातील नामवंत कवी आपल्या रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध करतील.दोन दिवस चालणाऱ्या या भव्य सांस्कृतिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहॆ. 

Share

Other News

ताज्या बातम्या