जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी मौ.तेर ता.उस्मानाबाद येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी अभियानाच्या सर्वेक्षणाची पाहणी केली तसेच ग्रामीण रुग्णालय तेर येथे भेट देवून (कोविड-19) कोरोना बाबतच्या उपायोजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी कोरोना आजारावरील उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुचना दिल्या. तसेच घरकुल योजनेचाही आढावा घेवून घरकुले पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.)जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.