शिवणी आरमाळ धरणाला विविध समस्याचे ग्रहण! दोन वर्षांपासून परिस्थिती जैसे थेच!

  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 25/09/2020 2:52 PM

देऊळगावमही (गजानन चोपडे)/प्रतिनिधी:-देऊळगाव राजा तालुक्यात येणारे शिवणी आरमाळ येथे लघु पाटबंधारे विभागाचा प्रकल्पा असून त्या प्रकल्पाच्या विंग वालला लागूनच आतील भागातुन गढूळ पाणी येत असून ते सांडव्याद्वारे पाणी कपिला नदीत गढूळ पाण्याचा विसर्ग सांडव्याद्वारे सुरू असल्याचे काही युवकांना आज सकाळी २४सप्टेंबर रोजी दिसले असता त्यांनी सदर प्रकार पत्रकार स्वप्नील शिंदे यांना सांगतास त्यानी सदर प्रकार लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अभिषेक बोरगमवार यांना सांगितल्या नंतर त्यांनी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली असता सदर प्रकार त्यांनी उपविभागीय शाखा अभियंता व्ही.सी. खोजे चिखली यांना सांगितल्या नंतर त्यांनी सुद्दा दुपारी या प्रकल्पाला भेट दिली असता गढूळ पाणी कमी झाल्याचे दिसून आले परंतु या धरणाखालील असलेल्या शिवणी आरमाळ, पाडळी शिंदे वाकद येथील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला असून सदर प्रकल्पाला विविध प्रकारच्या समस्यांचे ग्रहण लागलेले असताना प्रशासन दोन वर्षांपासून वेळकाढूपणा करीत असून शिवणी आरमाळ प्रकल्प यांच्या वरील विविध प्रकारच्या समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.त्यात संरक्षण भिंती वर झाडाझुडपे वाढलेली असताना पीचिंग सुद्धा उघडी पडलेली आहे.सांडव्यातून सुद्धा गळती  होत आहे.तसेच विंग वाल सुद्धा गळती लागलेली होती सदर प्रकल्‍पावरील या समस्या तत्काळ मार्गी लागाव्यात यासाठी  विविध वृत्तपत्रातून गेल्या दोन वर्षापासून वृत्त प्रकाशित होत असून संबंधित विभागाकडून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे उत्तर मिळत आहे.परंतु संबंधित विभागाकडून २०१७पासून शासनाकडे वेळोवेळी दुरुस्ती साठी प्रस्ताव पाठविले जात आहे.परंतु परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात संबंधित विभाग वारंवार अपयशी ठरल्याचे दिसून येत असून त्यामुळे समस्या जैसे थेच आहे!२००६साली सुद्दा या प्रकल्पाच्या विंग वाल च्या बाजूला संरक्षण भिंतीला भगदाड पडले होते.त्यात प्रशासनाकडून सीसे व सिंमेट टाकण्यात आले होते.ह्या   आठवणी ताज्या झाल्या आहेत. 
सदर प्रकल्पाला उपविभागीय अभियंता चिखली व्ही.सी.खोजे,शाखा अभियंता देऊळगाव राजा अभिषेक बोरगमवार,उध्दव सानप,सतिष कायंदे,पञकार स्वप्निल शिंदे,पञकार ज्ञानेश्वर म्हस्के व इतर परिसरातील ग्रामस्थ उपस्थीत होते.

जिल्हाधिकारी यांनीच लक्ष देण्याची गरज!
  देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी पुर्ण क्षमतेने भरला असुन सदर प्रकल्पाला विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासले असुन याबाबत गेल्या दोन वर्षापासुन संबंधित विभागाकडुन वेळकाढुपणा करण्यात येत आहे.सदर प्रकल्पाची समस्या जैसे थे असल्याने आता बुलढाणा जिल्ह्याला नवीनच लाभलेले जिल्हाधिकारी एस्.राममुर्ती यांनीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या