प्लाझ्मा बॅग साडे पाच हजारात मिळणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 25/09/2020 11:42 AM

कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून 5,500 हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
रुग्णांना किफायतशीर दरात हा प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती या समितीने अफेरॅसिस पध्दतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार, प्लाझ्मा बॅगसाठी (200 मिली) 5,500 रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर 1,200 रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किंमतीव्यतिरक्त) करण्यात आले आहे.
तर केमिल्युमिनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर 500 रुपये (प्लाझ्मा बॅग किंमती व्यतिरिक्त)आकारण्यास मान्यता दिली आहे प्लाझ्मा बॅगसाठी अधिक दर आकारल्यास खाजगी विश्वस्त रक्तपेढ्या रुग्णालयांकडून अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द केला जाईल,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.









देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)
7588888787

Share

Other News

ताज्या बातम्या