नवी मुंबई : दोन लोहमार्ग पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू.

  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 22/09/2020 8:36 PM

नवी मुंबई : लोहमार्ग पोलीस दलातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना कोविड-१९ महामारीच्या पार्श्र्वभूमीवर मृत्यूमुळे पोलिसांच्या मृत्यूची संख्या आता नऊ झाली आहे. त्यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल कोळी (५५) आणि पोलिस हवालदार विनोद पाटसकर कोळी हे एनआरआय पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यावर  तर पाटसकर हे बंदोबस्तात असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. नेरूळच्या डी वाय पाटील हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या