ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी वंचित राहू नये: कृष्णा गजबे


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 9/22/2020 5:46:15 PM

कुरखेडा:- 
  
       महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी शासन  स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन आमदार कृष्णा गजबे यांनी दिले
            राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत गेवर्धा परिसरातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना बँक नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारीची दखल घेत आमदार कृष्णा गजबे यांनी सोमवारी तालुक्यातील गेवर्धा परिसरातील शेतकर्यांसोबत गेवर्धा  येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत जाऊन बँकेचे व्यवस्थापक विकास महाजन यांचेशी सविस्तरपणे चर्चा केली असता  बँकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पत्र 450 लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली होती त्यापैकी 400 लाभार्थ्यांची टप्याटप्याने कर्ज मुक्ती करण्यात आले उर्वरित असलेल्या पात्र लाभार्थी लाभार्थ्यांची रक्कम अप्राप्त असल्याने त्यांना नवीन कर्ज सुद्धा देता येत नाही त्यांच्या कर्जमुक्ती झाल्यावर नवीन कर्ज देण्यात येईल अशी माहिती दिली  यावेळी उपनिबंधक सुशील वानखेडे ,रोशन सय्यद, देवराव सुकारे, नरेश डहाडे, शिवलाल सुलकिया, किसन भाकरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

नितीन देविकार (गडचिरोली जिल्हा उपसंपादक )
9404231937

Share

Other News