अभिनंदन व जाहीर आभार
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. धीरज सूर्यवंशी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
काल जिल्हा दौऱ्यावर आलेले केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ यांची भेट घेऊन, महापौर धीरज सूर्यवंशी यांनी कवलापूर विमानतळाचा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली. सांगलीच्या औद्योगिक आणि व्यापारिक विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.
महापौर या नात्याने त्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा नक्कीच कौतुकास्पद आहे. कवलापूर विमानतळाचा हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि सांगलीच्या वैभवात भर पडावी, यासाठी त्यांनी असाच पाठपुरावा सुरू ठेवावा, हीच अपेक्षा.
शुभेच्छुक:
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.