दिनांक :- 15/02/2026
-------------------------
---------------------
मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुध भेसळ करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेविरुध्द कारवाई करणे बाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/ समीर अभंग पोलीस अंमलदार, ह्रदय घोडके, संतोष खैरे, दिपक घाटकर, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनिल मालणकर, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन सदर पथकास दुध भेसळ करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेविरुध्द कारवाई करणे सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथक दिनांक 14/02/2026 रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत दुध भेसळ करणारे इसमांची माहिती काढत असतांना पो. नि. किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना इसम नामे रामदास नवनाथ उबाळे रा.फक्राबाद ता.जामखेड हा त्याचे दुध संकल केंद्रामध्ये केमीकल पासुन दुध तयार करुन ते संकलन झालेल्या दुधामध्ये मिक्स करत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पो.नि. किरणकुमार कबाडी स्थागुशा अहिल्यानगर यांनी श्री राजेश नामदेव बडे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशान विभाग, अहिल्यानगर यांना बोलावुन घेवुन त्यांचेसह रामदास उबाळे याचे दुध संकलन केंद्रावर छापा टाकला. सदर ठिकाणी 1) समीर कमरुद्दीन शेख वय- 30 वर्षे रा. उंबरे ता.राहुरी जि. अहिल्यानगर, 2) आफताब कलीम शेख वय- 28 वर्षे रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर, 3) रामदास नवनाथ उबाळे वय- 46 वर्षे रा. फक्राबाद ता.जामखेड हे मिळुन आले. त्यानंतर अन्न औषध प्रशान विभागाचे अधिकारी व पोलीस पथकाने दुध संकलन केंद्राची ठिकाणची पाहणी केली असता सदर ठिकाणी दुध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 6 ड्रममध्ये 1198 लिटर Paraffin नावाचे केमीकल, दुध पावडर मिळुन आले. सदर केमीकल बाबत ताब्यातील इसमांकडे विचारपुस करता त्यांनी सदरच्या केमीकल पासुन दुध तयार करण्यात येत असुन, 6 ड्रममधील केमीकल पासुन 24,000/- लिटर दुध तयार होत असल्याचे कळवले. त्यावेळी अन्न व औषध सुरक्षा अधिकारी यांनी सदर केमीकलची पाहणी करुन सदर केमीकल पासुन मानवी शरीरास घातक असे दुध तयार होत असल्याचे कळवले आहे.
ताब्यातील इसमांच्या कब्जातुन दुध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 2,39,600/- रु. कि.चे 1198 लिटर Paraffin Oil, 81,056/- रु कि.ची प्लास्टिक बॅगमध्ये पांढ-या रंगाची 300 किलोग्रॅम पावडर, 12,160/- रु कि.चे 320 लिटर केमीकल पासुन तयार केलेले दुध, 14,00,000/- रु कि.चे दोन पिकअप वाहन असा एकुण 17,32,816/- रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 84/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 274, 275, 123, 3(5) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26(1), 26(2)(i) शिक्षा कलम 57, 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर चे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.