सरळसेवेतील लिपिक टंकलेखक गट-क पदभरती परीक्षेची तारीख जाहीर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/02/2026 8:13 PM

नांदेड :-जिल्हा सैनिक कल्याण विभाग तसेच विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) या पदांसाठीची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण ७२ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा टिसीएस आयओएनमार्फत दिनांक १४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत घेण्यात येणार असून www.mahasainik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सदर परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या