आरटी आय न्यूज नेटवर्क
विजय जगदाळे
२० फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सातारा दि. : राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौध्द समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रु.१० लाखापर्यंत अनुदान योजना सन २०२५-२६ या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांनी आवाहन केले आहे.
अनुदानासाठी इच्छुक संस्थांनी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथ े दिनांक. २० फेब्रुवारी पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन अंतिमरित्या सदर योजनेंतर्गत अनुदानास पात्र होणा-या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल. या योजनेंतर्गत संस्थांनी यापूर्वी ज्या प्रयोजनार्थ अनुदान प्राप्त केले आहे, ते त्याच प्रयोजनार्थ उपयोगात आणले असल्याचे प्रमाणित करून त्याबाबतचे विहीत नमुन्यातील संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्या प्रतिस्वाक्षरीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. असेही श्री. थोरात यांनी कळविले आहे.