राणाप्रताप मंडळ, कुपवाडचा खेळाडू सार्थक हिरकुर्ब यास कांस्यापदक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/01/2026 1:45 PM

कुपवाड येथील राणाप्रताप मंडळाचा खेळाडू सार्थक हिरेकुर्ब याने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे यशस्वी कर्णधारपद भूषवत कांस्यपदक पटकावले.
राजस्थान केकारी येथे पार पडलेल्या 69 व्या 14 वर्षा खालील शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली होती. या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो संघाचे यशस्वी नेतृत्व करत सार्थक याने महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले.सार्थक याची सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत निवड होती. गेल्या वर्षी कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत त्याने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता.
  सार्थक हिरेकुर्ब यास राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील,अजित पाटील,रमेश पाटील,प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा.सचिन चव्हाण, विशाल बन्ने, शिवसागर पाटील, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,सागर नरदेकर, महेश कर्नाळे,अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी,धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,शितल कर्नाळे,अक्षय पाटील, धनंजय पाटील, तक्षक गौडाजे,सुनिल सुतार, अभिषेक कर्नाळे,निलेश पवार, अमोल पाटील, अभिजीत सुतार, शुभम पाटील, दिपक पाडळे,स्वप्नील पाटील, अनिल हिरेकुर्ब, पोपट नरदेकर,वासुदेव जमदाडे आंदिचे मार्गदर्शन मिळत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या