गुरु रविदास साहित्य संमेलन विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/01/2026 11:42 AM

नांदेड  : आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन येत्या रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आले असून त्यात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
       प्रत्येक व्यक्तीत सुप्त गुण दडलेले असतात, योग्य वेळ आणि संधी आल्यावर त्याच्यातील कलागुणांचा आविष्कार होत असतो. अशा गुणी जणांचा आणि कलावंतांचा गौरव व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात गुणीजनांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
        इच्छुकांनी आपला सविस्तर परिचय (बायोडाटा) दोन रंगीन पासपोर्ट फोटोंसह टपालाने तात्काळ "इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, विजयनगर, तरोडा बु. नांदेड - ४३१६०५" या पत्त्यावर पाठवावा. साहित्य पुरस्कारासाठी मागील पाच वर्षात प्रकाशित पुस्तकाच्या तीन प्रती पाठविणे आवश्यक आहे. वृत्तपत्रीय कात्रणे मोजकी पाठवावीत.
       तथागत गौतम बुद्ध, म. बसवण्णा, वीर कक्कय्या, संत हरळय्या, गुरु रविदास, गुरु घासीदास, गुरु नानक, गुरु गोविंदसिंह, गुरु तेग बहादूर, संत कबीर, संत मीराबाई, माता लोणाई, माता कल्याणमा, माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, म. जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा बी, मुक्ता साळवे, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. शाहू महाराज, लहुजी साळवे, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत जगनाडे महाराज, संत नामदेव, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत गोरोबा काका, संत चोखा मेळा, संत संता माय, योद्धा टिपू सुलतान, ए पी जे अब्दुल कलाम, बिरसा मुंडा, पेरियार रामास्वामी नायकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, वीरांगना झलकारीबाई, संत गाडगेबाबा, मा. कांशीरामजी, वसंतराव नाईक, शहिद भगतसिंह, कर्पूरीसिंह ठाकूर, व्ही. पी. सिंह इत्यादी महामानवांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातील. याशिवाय आणखी कांही महामानव संत महात्मे गुरु असतील तर त्यांच्या नावाचाही विचार करण्यात येईल तरी आपणास अपेक्षित योग्य ते नाव सुचवावे.
        अधिक माहितीसाठी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर (मो. ९४२३७८१११४) यांचेशी संपर्क साधावा. कार्यक्रम संयोजन शुल्क, सामाजिक योगदान किंवा साहित्य संमेलन निधी म्हणून कोणत्या का स्वरुपात स्वेच्छेने केलेले सहकार्य अपेक्षित आहे, कारण त्याशिवाय कार्यक्रम घेणे अशक्य आहे. हे साहित्य संमेलन सर्वांगाने दर्जेदार व यशस्वी होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या