कुपवाडमध्ये रंगणार आजपासून राणाप्रताप खो- खो प्रिमियर लीगचा थरार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/01/2026 11:48 AM


  कुपवाड येथे आजपासून तीन दिवस राणाप्रताप खो-खो प्रिमियर लीग स्पर्धेचा थरार खो-खो प्रेमींना पहायला मिळणार आहे.
     राणाप्रताप मंडळाकडून गेली पाच वर्षापासून खो-खो प्रिमियर लीगचे आयोजन केले जात आहे. ह्या वर्षी लीगचे सहावे पर्व आहे.आजपासून तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 'रायगड वाॅरियर्स' संघाचे संघमालक गोमटेश डेव्हलपर्सचे प्रमोद पाटील. 'प्रतापगड डिफेंडर्स' संघाचे संघमालक स्टार टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल चे शीतल पाटील. 'शिवनेरी अटॅकर्स' संघाचे संघमालक सन्मती मिडिया चे शीतल पाटील. वेदांत सेल्स चे अविनाश गौंडाजे. व 'राजगड चॅलेंजर्स' संघाचे संघमालक चिंतामणी मोबाईलचे सचिन नरदेकर. यांच्या संघात पुढील तीन दिवस सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सामना रंगणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाना कै.विजय गौंडाजे यांच्या स्मरणार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुपवाड शहर अध्यक्ष प्रमोद गौंडाजे यांच्याकडून चषक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच अनेक वैयक्तिक बक्षीसे देण्यात येणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन आज शनिवार सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.बक्षीस वितरण सोमवारी रात्री होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या