७७ वा प्रजासत्ताक दिन भगूर येथील सावरकर जन्मस्थान स्मारकात उत्साहात साजरा
यावेळी नगरसेवक दिपक बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
प्रसंगी काकासाहेब देशमुख व विशाल बलकवडे यांच्या हस्ते सावरकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसंगी दिपक बलकवडे यांचा भूषण कापसे व काकासाहेब देशमुख यांचा आकाश नेहेरे यांनी यांनीस स्मारकच्या वतीने सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बुरके यांनी केले
यावेळी मनोज कुवर, खंडू रामगडे भगूरचे नगरसेवक बबलू जाधव, सुदाम वालझाडे, अजय वाहणे, अमोल इंदरखे, विद्या बलकवडे, जयश्री देशमु, सोनाली सोनावणे, अश्विनी भवार, अर्चना बुरके, मनीषा कस्तुरे, लता थापेकर, संभाजी देशमुख, ओम देशमुख, संतोष मोजाड, सुनिल जोरे, प्रविण वाघ, योगेश पाचपोर, संजय जाधव, मंगेश बुरके, उमेश मोहिते, ओम गायकवाड, प्रणाम्य पाचपोर, शेखर जोशी, स्वाती जोशी, श्रुतिका करंजकर, अनुष्का जोशी, आरोही कुवर प्राजक्ता पाचपोर आदी उपस्थित होते.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक शाखेच्या वतीने सावरकर स्मारकात प्रजासत्ताक दिना निमित्ताने १२ सूर्यनमस्कार करून बलोउपास्नेच्या माध्यमातून स्वा. सावरकर व भारतमातेस वंदन करण्यात आले. यावेळी श्रुतिका करंजकर हिने उपस्थितांना देशभक्तीपर मार्गदर्शन केले यावेळी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक शाखा व्यवस्था प्रमुख शुभम दादा जाधव, युवा प्रमुख लिशा ताई, महाविद्यालयीन प्रतिनिधी व आयटी तील गणेश जाधव व मयूर पगार आदी उपस्थित होते.