पिंपरी चिंचवड दि१५ :- रहाटणी परिसरात एका महिलेच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या टाकून महिलेच्या नकळत गर्भपात केला. व माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती शेखर रामदास वाघुले (वय ३०, रा. रहाटणी. मूळ रा.वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर), सासरे रामदास वाघुले,सासू आशा वाघुले (दोघे रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता.जुन्नर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन माहेरहून पैसे आणण्याची वेळोवेळी मागणी केली. कौटुंबिक कारणांवरून मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादी विवाहिता गरोदर असताना आरोपी पती शेखर याने विवाहितेच्या नकळत तिच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या मिक्स केल्या. त्याद्वारे तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.व पुढील तपास वाकड पोलीस म.पो.उ.नी गोडे हे करीत आहेत.