ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कु.चंचल सुरज कोरचा हिची नवोदयसाठी निवड

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 6/30/2020 9:08:25 PM

कोरची:- बेडगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाहकाटोला येथिल कु.चंचल सुरज कोरचा हिची नवोदयसाठी निवड झाली असून ती जिल्हातून द्वितीय आली.सत्र 2019-20 मध्ये झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या यादीत स्थान मिळवून प्रवेशाकरिता पात्र ठरली आहे.जिद्द चिकाटी परिश्रम य़ा जोरावर उंच शिखरावर जाता येते हे या सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने दाखविले आहे.निवड झालेला चंचल सुरज कोरचा हिने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक गौरव कावळे, शिक्षक कु.एच र पोवले व आई वडील यांना दिले असून त्याचे विद्यार्थि व पालकवर्गा तर्फे आणि शाळा व्यवस्थापन सीमीतीतील पदाधिकारी , मुख्याध्यापक , आणि इतर सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Share

Other News