मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यत ४ लाख ५६ हजार अर्ज मान्य;आपले आधार बँकेच्या खात्याशी संलग्न करा –जिल्हाधिकारी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/08/2024 7:30 PM

नांदेड  :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महिलांनी अधिक पसंती दिली असून या योजनेत जिल्ह्यात आतापर्यत 5 लाखांच्या जवळपास महिलांनी अर्ज केले आहेत.  त्यापैकी 4 लाख 59 हजार 317 अर्ज मंजूर असून त्यांची टक्केवारी 97.11 एवढी आहे. तर आजच्या दिवशीपर्यत जिल्हा समितीने मान्यता दिलेल्या अर्जाची एकूण संख्या 4 लाख 56 हजार 585 आहे. या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे बाकी आहे अशा महिलांनी तात्काळ त्यांचे आधार संलग्नीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना येत्या 17 ऑगस्टला जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच महिलांनी या योजनेतील अर्जात नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केले आहे की नाही यांची खातरजमा करावी. कारण ज्यांचे खाते संलग्न नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याअगोदरही याबाबत प्रशासनातर्फे वारंवार आवाहन केले असून अजूनही जिल्ह्यातील जवळपास 70 हजार महिलांचे आधार संलग्न करणे बाकी असल्याचे दिसून आले आहे. तरी महिलांनी तात्काळ आपले आधार संलग्नीकरण करण्याची कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या