श्रीमती राजमती नेमगोडा पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्यु कॉलेजमध्ये गुरुपोर्णिमा उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/07/2024 11:39 AM

श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हाय.व ज्यु.कॉलेज सांगली येथे *गुरु पौर्णिमा* चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरवात कु.आरती सोलंकरे हिच्या स्वागत गीताने झाली. स्वागत व प्रस्ताविक कु.वरदा इंगुळकर या विद्यार्थिनीने केले. यानंतर महर्षी व्यास मुनींच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री.बी.बी.सावळवाडे यांच्या हस्ते झाले.यावेळी मुख्याध्यापक यांचे स्वागत ज्यु.विभाग प्रमुख डॉ.ए.बी.पाटील सर यांनी केले.पर्यवेक्षिका सौ.जे.एस.इचलकरंजे मॅडम यांचे स्वागत सौ.एस.एम.पाटील मॅडम यांनी केले. यावेळी गुरुपौर्णिमा निमित्त विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री.बी.बी.सावळवाडे सर यांनी रामायण व महाभारत यामधील उदाहरणे देऊन गुरु  शिष्य यामधील नाते कसे असावे हे सांगितले.पर्यवेक्षिका सौ.जे.एस.इचलकरंजे मॅडम यांनी  रामायण व महाभारत या काळातील गुरुपौर्णिमा व आधुनिक काळातील गुरुपौर्णिमा यामधील फरक सांगितला.यावेळी इ.१२ वी मधील विद्यार्थिनींनी सरस्वतीची मूर्ती भेट दिली. कार्यक्रमाची सांगता कु.सावली कोळी हिच्या गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी व प्रिती  यांनी केले.आभार श्री.चौगुले सर यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या