विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची किंवा माजी लोकप्रतिनिधींची शासकीय नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांनी करावी. उबाठा शिवसेना भगूर शहरप्रमुख श्री काकासाहेब देशमुख यांची मागणी

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 20/07/2024 9:44 AM

रहिवासी दाखला व झेरॉक्सवर असिस्टेड सत्यप्रत करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची किंवा माजी लोकप्रतिनिधींची शासकीय नेमणूक   जिल्हाधिकाऱ्यांनी  करावी अशी मागणी उबाठा शिवसेना भगूर शहरप्रमुख श्री काकासाहेब देशमुख यांनी केली 

 शासकीय कागदपत्रे व  तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय कामासाठी तसेच महसूल विभागातील  ओरिजनलच्या कागदपत्रांच्या  झेरॉक्सवर सत्यप्रत म्हणून व रहिवासी दाखले देण्यासाठी शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी नगराध्यक्ष नगरसेवक, सरपंच ग्रामपंचायत शासनाच्या वतीने विशेष अधिकार प्राप्त दिलेले असतात परंतु सध्या तीन वर्षापासून महानगरपालिका, नगरपालिका कॅन्टोन्मेंटबोर्डच्या, ग्रामपंचायती, इलेक्शन लांबल्यामुळे सदरील तीन वर्षापासून पद रिक्त झाले आहेत त्यामुळे सदरील अधिकार माजी लोकप्रतिनिधींना नसल्यामुळे परंतु सर्वसामान्य नागरिकांना असिंस्टेड करण्यासाठी व रहिवासी दाखला देण्यासाठी दारोदारी भटकावे लागत आहे तरी विशेष कार्यकारी अधिकारी नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे जातात सदरील पद हे तीन वर्षापासून कालबाह्य झाल्यामुळे  त्यांच्याकडे तो अधिकार नसल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतभेद तयार होत आहे   नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमात व मानसिक त्रास निर्माण होत आहे तीन वर्षापासून शासकीय निमशासकीय महसूल खात्यासाठी लागणारे पेपर ओरिजनल न देता  झेरॉक्स म्हणून देण्यासाठी प्रामाणिकरण करून देणे गरजेचे असते खरेदी विक्रीचे डॉक्युमेंट्स शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या शाळेच्या प्रवेशाच्या वेळेस शिष्यवृत्तीसाठी रहिवासी दाखले, लाडकी बहिण योजना तसेच शासनाच्या विविध योजनेसाठी बँक तलाठी तसेच इतर कामासाठी झेरॉक्सवर प्रमाणीकरण सत्यप्रत पेपर शासनाकडून मागितले जातात परंतु  सध्या रहिवासी दाखला व असिस्टंट करण्याचा कोणालाही अधिकार  लोकप्रतिनिधींना व विशेष कार्यकारी  अधिकाऱ्यांना नसल्यामुळे सर्वसामान्यांना नागरिकांना विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी शासनमान्य विशेष कार्यकारी अधिकारी किंवा माजी नगरसेवकांना व ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत अधिकार देण्यात यावे अशी मागणी शिवसेना  भगूर शहरप्रमुख श्री काकासाहेब देशमुख माजी शहर प्रमुख युवराज शिरसाठ मा नगरसेवक पद्माकर शिरसाट जेके जाधव लीलाबाई दिवटे जयश्री देशमुख किशोर कुंडारिया एसटी कामगार नेते सुभाष जाधव शशिकांत देशमुख मनोज कुवर प्रसाद खडे शुभम जाधव अनिल देशमुख योगेश लकारिया प्रकाश देशमुख रोशन करंजकर अनिकेत गायकवाड यांनी सर्वसामान्य नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी नेमावे किंवा माजी नगरसेवकांना तो अधिकार देण्यात यावा अशी  नागरिकांनी मागणी केली आहे

Share

Other News

ताज्या बातम्या