प्रति
मा. आयुक्त
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
विषय :- कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामाबाबत
महोदय
आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कुपवाड ड्रेनेज योजना कामाला सुरुवात करत असता पासून वादग्रस्त राहिलेले आहे कुपवाड मधील बराचसा भाग हा मुरमाड असून सदर ठिकाणचा मुरूम विकण्याचे प्रकार उघडीस आलेले आहेत त्याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कुपवाड तलाठी ऑफिस कडून त्याबाबत नोटीस सुद्धा काढण्यात आल्या होत्या त्याची चौकशी करून त्याबाबत काय कारवाई झालेले आहे ते अहवाल सार्वजनिक करण्यात यावा
त्याच पद्धतीने सदर योजनेचे काम व चेंबर हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत ह्याबाबत सुद्धा तक्रारी झालेल्या आहेत त्या तक्रारीची शहानिशा करून चौकशी करून काय कारवाई केली आहे हे कळत नाही
तसेच सदर अंदाजपत्रकामध्ये जागेवर ज्या पद्धतीने रस्ता होता उदाहरण खडीकरण मुरमीकरणाचा असेल बीबीएम डांबरी असेल हॉटमिक्स डांबरी असेल ड्रेनेज योजनेची पाईपलाईन टाकल्यानंतर पूर्वी जसा होता त्याच पद्धतीने रस्ता करून देण्याची जबाबदारी ड्रेनेज ठेकेदाराची आहे
मात्र याबाबत उचित कारवाई होते का नाही हे पाहण्यासाठी मनपाचे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी ठेकेदाराशी संधान साधून काम करताना दिसत आहेत
कुपवाड ड्रेनेज योजनेचा नकाशा घेऊन ज्या ठिकाणी मनपाच्या व सार्वजनिक बांधकाम वतीने जे रस्ते प्रस्तावित आहेत त्याचा आढावा घेऊन क्रॉस चेक करावे कारण देणे ठेकेदार रस्ता न करता मनपाकडून व सार्वजनिक बांधकामांकडून ड्रेनेजच्या चरी मुजवून घेऊन डबल बिल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आत्तापर्यंत ड्रेनेज योजनेचे झालेल्या कामाची चौकशी करून असा प्रकार घडलेला आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यात यावी अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.