मा आयुक्त सो,
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका
विषय - कुपवाड शहर मधील मुख्य रस्ता ट्रीमिक्स कामाबाबत.
महोदय,
कुपवाड शहरात काल पासून मुख्य रस्त्यावर 400 मीटर ट्रीमिक्स रस्त्याचे काम चालू झाले आहे परंतु सदर रस्त्याच्या उत्तर बाजूस महावितरण चे विद्युत पोल हे रस्त्याच्या मध्यभागी येत आहेत सदर पोल हटवण्यासाठी गेली दोन वर्षे आम्ही पाठपुरावा करीत आहोत परंतु अजून ते हटवले गेली नाहीत
सदर रस्ता झाल्यावर हे विद्युत पोल त्या मध्ये येतील त्या मुळे वाहतुकीस अडचण होणार आहे तसेच सदर पोल मुळे अपघात होण्याची शक्यता आहे त्या मुळे सदर कामाची आपण प्रत्यक्ष पाहणी करावी व सदर पोल हटवले नंतर रस्त्याच्या कामाची सुरुवात करावी नाहीतर ज्या दिवशी उत्तर बाजूचे काम चालू होईल त्या दिवस पासून आपणास न सूचना देत नागरिकास दोबत पुन्हा उपोषण साठी बसणार आहोत या बाबत आपणास पुन्हा पत्र व्यवहार करणार नाही....
ही विनंती.
स्वप्नील खोत,
सामाजिक कार्यकर्ते.