बेकायदेशीर धोकादायक होर्डींग, टॉवर्स, धोकादायक झाडे इत्यादीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, लोकहित मंचची मागणी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/05/2024 3:47 PM

प्रति,
माननीय श्री शुभम गुप्ता सो
आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली 
*विषय:- बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीचे होर्डिंग, बिलबोर्ड, स्वागत कमानी, टॉवर्स धोकादायक झाडे त्यादी चा सर्वे (स्ट्रक्चर ऑडिट) होण्याबाबत* 
महोदय, 
कालच मुंबई मध्ये सोसाट्याच्या वाऱ्याने होर्डिंग बिलबोर्ड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाल्याच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसारित झाल्या. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे  तदनंतर सदरचे होर्डिंग हे बेकायदेशीर होते ठरवलेल्या 40× 40 या आकाराच्या पेक्षा तिप्पट मोठे म्हणजे 120 ×120 या प्रमाणात व बेकायदेशीर पद्धतीने लावण्यात आले होते असे समजत आहे. काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये रस्त्यावर लावलेली स्वागत कमान पडल्यामुळे अनेक लोक जायबंदी झाले होते
अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर सोसाट्याच्या वाऱ्याने असे मोठे होर्डिंग इमारतीवरील टॉवर्स, कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण होत आहे. हे टाळण्यासाठी सांगलीकर जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सांगली मिरज कुपवाड महापालिका कार्यक्षेत्रातील बोर्ड होल्डिंग बिलबर्ड मोबाईल टॉवर्स अथवा इतर पद्धतीचे टॉवर्स यांचा सर्वे करण्याची मागणी करत आहोत. सदर गोष्टी उभारण्यापूर्वी महापालिकेकडून परवानगी घेण्यात आलेली आहे किंवा कसे,  परवानगी घेतली असल्यास परवानगी चे नूतनीकरण झाले आहे अथवा कसे,  नूतनीकरण केले नसल्यास महापालिकेने सदर स्ट्रक्चर काढून टाकले आहे किंवा कसे या गोष्टींसह इमारतीवरील तसेच खाजगी जागेतील अशा गोष्टींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. अनेक मोठ्या व्यावसायिकांनी सांगली मिरज रोड सांगली कोल्हापूर रोड तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या रस्त्यावरून आपल्या व्यवसायाच्या जाहिराती मोठ्या होर्डिंग मार्फत केलेले आहेत परंतु या होर्डिंग ना वारे जाण्यासाठी छिद्रे केलेली नाहीत त्यामुळे मोठ्या वाऱ्याने ही होर्डिंग पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे .याच पार्श्वभूमीवर वादळी वाऱ्याने वाढलेली झाडे तसेच झाडांच्या फांद्या वीजवाहकताऱ्यावर पडून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता आहे. पावसाच्या वेळी झाडांच्या फांद्या तुटून पडून अनेक वेळा जीवित व मालमत्ता हानी झालेल्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत हे टाळण्यासाठी महापालिकेने आपली यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरून अशा झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची कटाई करणे आवश्यक आहे. तरी माननीय आयुक्त सो विनंती की उपरोक्त सर्व गोष्टींचा गंभीरपणे विचार करून महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणेला  कार्यरत करावे व   सांगलीतील भविष्यातील जीवितहानी व वित्तहानी टाळावी विनंती.



**  मनोज भिसे
  (अध्यक्ष लोकहित मंच  सांगली  )

Share

Other News

ताज्या बातम्या