अनिता सागर माने यांचा आदर्श सर्वानी घ्यावा : कांचनताई कांबळे माजी महापौर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/05/2024 7:40 AM

      घरची परिस्थिती तशी अत्यंत बेताचीच  लहान दोन मुले पती सासुबाई असा परिवार संसाराची जबाबदारी पती सागर माने यांचे खांद्यावरती असलेमुळे अनिता यांना घरातील सर्व कामे करावी लागत असत अनिताने डी.एड चे शिक्षण घेतलेले होते शिक्षक बनुन पतीस संसारामध्ये  हातभार लावायचा  असा निर्धार अनिताने केला होता दोन मुले व घर परिवार यांचे पालन‌पोषण करुन अनिताने शिक्षण सेवक परिक्षेमध्ये यश संपादन करुन चंद्रपूर जिल्हा परिषद येथे शिक्षक पदी निवड निवड होऊन यश मिळविले अशा कठीण परिस्थितीतही अनिताने जिद्दीने यश संपादन केले आहे याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आवाहन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर कांचनताई कांबळे यांनी अनिता सागर माने या दांपत्याच्या सत्कार प्रसंगी केले.

"यावेळी बोलताना अनिता माने म्हणाल्या की निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे कृपा आशिर्वादाने व शिकवणीणे हे सर्व शक्य झाले असल्याचे सांगितले"
          
यावेळी माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्या मातोश्री रंजना सरगर सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थापक अध्यक्ष तानाजी होनमाने आणि धनगर फ्रेंड सर्कलचे प्रवीण येडगे, विकास डोंबाळे व सुभाष नगर मधील सर्व नागरिक यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला. यादरम्यान तानाजी होनमाने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली, संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाची सांगता प्रवीण एडगे धनगर फ्रेंड सर्कल अध्यक्ष यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या