भगूर येथे खंडेराव महाराज यात्रौत्सव*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 22/02/2024 9:51 PM

*भगूर येथे खंडेराव महाराज यात्रौत्सव*

भगुर वार्ताहर:- नाशिक तालुक्यातील भगूर येथे माघ पौर्णिमा अर्थात शनिवार (दि.२४)पासून खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ होणार असून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजराने भगूर नगरी दुमदुमणार आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाईने मंदिर सुशोभित केले जाणार आहे. भाविकांसाठी मंदीराचे पुजारी खैरे कुटुंबाने  विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेराव महाराजांच्या जेजुरीनंतर भगूर येथील यात्रोत्सवास अनन्य साधारण महत्त्व आहे. यात्रोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील मल्हार भक्त हजारोंच्या संख्येने येथे हजेरी लावतात. त्यानिमित्त कोटम भरणे, तळी भरणे, देव भेटवणे आदी धार्मिक विधी पार पाडले जातात. माघ पौर्णिमेपासून यात्रोत्सवास प्रारंभ होतो. या पार्श्वभूमीवर मंदिरास रंगरंगोटी केली जात असून खंडेराव महाराज, म्हाळसाई व बाणाई यांच्या मूर्तींनाही रंगकाम करण्यात आले आहे.
खैरे कुटुंबीय यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते देवाला नवीन वस्त्र परिधान करुन महापूजा व महाआरती झाल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ होईल. माघ पौर्णिमेच्या गोरज मुहूर्तावर सायंकाळी मानाच्या काठी व खंडेराव, म्हाळसाई, बाणाई यांच्या मूर्तींची पालखी मिरवणूक काढण्यात येईल. यात्रोत्सवानिमित्त खेळणी, पाळणे, करमणुकीची साधने, हॉटेल्स, संसारोपयोगी वस्तू आदींची दुकाने थाटण्यात येणार आहे. 
अशी माहिती पुजारी विलास खैरे यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या