श्री एकनाथराव सहादू शेटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांच्या विचार स्मृतींना प्रफुल्लित करीत विद्येचे महत्त्व सांगण्यात आले, याप्रसंगी
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून भगूर येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका उषा परदेशी या उपस्थित होत्या, तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राजू सानप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सौ उषा परदेशी यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले तसेच संकटांना सामोरे कसे जावे याचे धैर्य विद्यार्थिनींनी स्वतःमध्ये रुजवावे तसेच समाज सेवा हीच ईश्वर सेवा असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव जागृत केला.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले तसेच तसेच भारतीय संस्कार हाच समाजाचा आत्मा आहे या संदेशाची प्रचिती प्रमुख पाहुण्यांनी दिली , प्राचार्य डॉ मृत्युंजय कापसे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या विचाराने कृतीप्रवण होऊन समाजसेवा करणे हेच त्यांना अभिवादन असल्याचे नमूद केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका सुप्रिया हांडोरे यांनी सूत्रसंचालन केले तसेच प्राध्यापिका रोहिणी जगताप यांनी पाहुण्यांचे आभार मानले, सामूहिक पसायदानाच्या पठणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.