आज सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी, सकाळी १० वाजता , सांगली जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नियोजित नूतन वास्तूच्या भूमिपूजनाचा समारंभ संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व संघटन मंत्री श्री मकरंद देशपांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मनीषा देशपांडे यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे , खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर दादा गाडगीळ , जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील, लोकसभा संयोजक शेखर इनामदार, यांनी मुहूर्ताची कुदळ मारून भूमिपूजन केले. यावेळी नीताताई केळकर भारतीताई दिगडे, संगीताताई खोत , माजी आमदार नितीन राजे शिंदे दिनकर तात्या पाटील, मुन्ना कुरणे, स्वातीताई शिंदे, सीबी आप्पा पाटील, प्रकाश बिरजे, नितीन देशमाने, मिलिंद कोरे, राजाराम गरुड यांच्यासह सांगली शहर व ग्रामीण जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते पक्षाच्या कार्यालयासाठी कुंभार नगर ,गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग येथे अडीच एकर जागा खरेदी करण्यात आली असून तेथे पुढील एक वर्षाच्या आत सांगली शहर व ग्रामीण जिल्ह्याचे संयुक्त असे १७ हजार चौरस फुटाचे भव्य कार्यालय होणार आहे. यामध्ये प्रशस्त हॉल, पदाधिकाऱ्यांच्यासाठी केबिन, मीटिंग आणि पत्रकार परिषदेसाठी स्वतंत्र कॉन्फरन्स रूम , जिल्ह्यातील बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या साठी निवासाची सोय, तसेच चार ते पाच हजार कार्यकर्त्यांचा मेळावा होईल इतकी मोकळी जागा.. अशा पद्धतीने कार्यालयाचे भव्य स्वरूप असणार आहे सांगलीतील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्री समीर गोखले यांनी या कार्यालयाचा सुंदर आराखडा तयार केला असून पुढील कामाला लगेच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालक मंत्री सुरेश भाऊ खाडे, मकरंद देशपांडे, खासदार संजय काका, आमदार सुधीर दादा, नीता ताई केळकर, शेखर इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रकाश ढंग यांनी मानले.