सावंगा खुर्द कडे जाणारा पुलाचे लोकार्पण सोहळा संपन्न

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 10/02/2024 12:07 PM



धानोरा : तालुक्यातील पेंढरी गट्टा क्षेत्रातील छत्तीसगढ नजीक असलेल्या सावंगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगा (खुर्द) या गावी जाणाऱ्या बांडीया नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. पुल बांधकाम पूर्ण झाले त्यानिमित्ताने या पुलाचे लोकार्पण सोहळा पार पडला. 
महाविकास आघाडीच्या काळात सदर पुलाचे काम मंजूर झाले होते. परंतु काही कारणास्तव बांधकाम रखडले होते. या भागातील लोकांची ओरड व स्थानिक प्रतिनिधी यांची मागणी नंतर त्या रखडलेला कामाची सुरुवात झाली. त्यानंतर पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक प्रतिनिधि व क्षेत्रातील नागरिकांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण सोहळा पार पडला. यामुळे त्या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

  यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, माजी सदस्य विनोद लेनगुरे, सावंगा ग्रामपंचायत चे सरपंचा रंजिता नैताम, कामनगडचे सरपंच संजय गावडे, माजी सरपंच बाबुराव गेडाम, धानोरा आदिवासीं काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत कोराम, छबीलाल बेसरा, मनिराम गावडे, मसरू हिचामी, सावंगाचे भुमिया संतोष जांगी, गाव पाटील माणिक हिचामी, गाव भूमिया महादेव मडावी, पयडी गाव भुमिया दामजी करंगामी, मंगेवडा गाव भुमिया दिलीप वालको, सावंगा खुर्द गावपाटील शामराव मडावी, निरू नरोटे, लालू गावडे, माधो मडावी, आनंदराव गेडाम, सोमजी करंगामी, मातकी करंगामी, देवराव मडावी, दामजी उसेंडी, मंगरू मडावी, मानू नैताम, दलपत मडावी, मनुराम नैताम, निखिल उसेंडी, सुखदेव नैताम, आर एन मडावी, सुरेश उसेंडी, धनुराम नैताम, शंकर नैताम, केशव मडावी, नामदेव मडावी, मधुकर मडावी, माधो नैताम, देवानाथ मडावी, रमेश नैताम, सनीराम मडावी, कालिदास मडावी, संजय मडावी, मनिराम पदा, सकरू गावडे, मनकू वडडे, जैनु गावडे आदी क्षेत्रातील गावकरी व महीला उपस्थित होते.

तसेच त्या भागातील मंगेवाडा व छत्तीसगढ राज्याकडे जाणारा बांडीया नदीच्या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे अशी सुद्धा मागणी खुप वर्षा पासून होत आहे, तरी सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे कामनगड ग्रामपंचायत चे सरपंच संजय गावडे यांनी मागणी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या