राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे गुरुद्वारा येथे सेवारूपी आगळेवेगळे आंदोलन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/11/2023 8:15 PM

नांदेड : राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने गुरुनानक जन्मोत्सवानिमित्त सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड येथे येणाऱ्या भाविकांसाठी आपली सेवा प्रदान केली असून हा एक दिवसीय आगळा वगळा उपक्रम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला होता .
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समिती महाराष्ट्र राज्य २५ ऑक्टोबर २०२३ पासून संपूर्ण राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करीत असून याचाच भाग म्हणून राज्यात प्रत्येक जिल्हास्तरावर शासन सेवेत सदर अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत .
गुरुनानक जयंती निमित्त सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असून सुद्धा सदर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी वर्ग सुट्टीचा दिवसही समाज उपयोगी कार्यरूपी आंदोलन व्हावे हा दृष्टिकोन विचारात ठेवून शिख बांधवांची काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारा येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी,पर्यवेक्षक,नर्सेस , आरोग्य खात्यातील कर्मचारी संप काळातील एक आगळावेगळा उपक्रम गुरुव्दारा नानकजीरा चे सदस्य डॉ.हरदीपसिंघ खालसा यांच्या सहकार्याने संपन्न झाला .

Share

Other News

ताज्या बातम्या