एसटी नांदेड आगाराचे वाहतूक नियंत्रक राजेंद्र निळेकर, वाहक हनमंत शिराळे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/04/2023 10:35 AM

नांदेड- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथील दोन कर्मचारी वयाची ५८ वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल दि. ३१ मार्च २०२३ शुक्रवार रोजी दुपारी ठिक २ वाजता त्यांचा आगाराच्यावतीने सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला.
यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्रकुमार सितारामपंत निळेकर (वाहतूक नियंत्रक) २५ वर्षे सेवा, वाहक हनमंत किशनराव शिराळे (वाहक क्रं. ८०) २५ वर्षे सेवा यांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम हे होते तर विचारमंचावर कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, नांदेड कृ.उ.बा.स. सभापती बी.आर. कदम पाटील, संचालक शिवसांब बारसे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हनमंतराव ठाकूर, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, वाहतूक निरीक्षक आकाश भिसे, लेखाकार सतीश गुंजकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, प्रा. धाराशिव शिराळे, पाळी प्रमुख नागोराव पनसवाड, संभाजी जोगदंड, पहेलवान जगजीतसिंग गाडीवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम यांच्या हस्ते दोन्ही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा शाल, श्रीफळ, प्रवास बॅग, एसटी कामगार कल्याण गौरव समितीच्यावतीने स्मृतीचिन्ह, पुष्पहार देऊन सपत्नीक हृदय सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी संयोजन समितीच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार राजू घागरदरे, कांतीलाल दुर्गे, कल्पना मोरे, सविता निलेवाड, सिद्धार्थ जोंधळे, गुणवंत एच. मिसलवाड, माधव सुरेवाड यांनी केला.
यावेळी वरील सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप आशिष मेश्राम यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन मांजरमकर यांनी मांडले. याप्रसंगी सर्व युनियनचे पदाधिकारी, कामगार, कर्मचारी बंधु- भगिणी व नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या