दिव्यांगांची सेवा हीच ईश्वर सेवा - समाजकल्याण अधिकारी बापू दासरी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 31/03/2023 5:57 PM

नांदेड :- दिव्यांगांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे यासाठी दिव्यांगांच्या पालकांनी त्यांच्या मुलाचे योग्य संगोपन व आवश्यक गरजा पूर्ण केल्यास ईश्वर सेवेचा लाभ यातून आपणास मिळेल असे प्रतिपादन विशेष समाजकल्याण अधिकारी बापू दासरी यांनी केले आहे.तेलंगाना राज्यातील सिकिंदराबादच्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, नागपूर येथील संयुक्त प्रादेशिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक सहभागातून बौद्धिक दिव्यांग विद्यार्थांसाठीच्या शैक्षणिक साहित्याचे (टी.एल.एम. कीट) वितरण सोहळा शुक्रवार दि ३१ मार्च रोजी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विशेष समाजकल्याण अधिकारी बापू दासरी बोलत होते. व्यासपीठावर डॉ. लक्ष्मीकांत बजाज, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेच्या मुंबई येथील प्रादेशिक केंद्राचे अधिव्याख्याता (विशेष शिक्षण) ज्ञानेश्वर सावंत, नागपूर येथील संयुक्त प्रादेशिक केंद्राचे सहायक अधिव्याख्याता जगन मुदगडे, मुख्याध्यापक नितिन निर्मल आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना विशेष समाजकल्याण अधिकारी बापू दासरी म्हणाले की बहुतांश पालक आपला मुलगा दिव्यांग असल्याचे समाजापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. यामुळे विद्यार्थ्याची प्रगती खुंटते. अशा विद्यार्थ्यांनाही समाजात पुढे आणून त्यांचा परिचय करून देणे गरजेचे आहे. विशेष शाळा व पालकांचा प्रयत्नातून दिव्यांगांची प्रगती शक्य आहे. घरात असलेल्या दिव्यांग मुलाचे योग्य संगोपन व आवश्यक गरजा पूर्ण केल्यास ईश्वर सेवेचा लाभ यातूनच आपणास मिळेल असे प्रतिपादन विशेष समाजकल्याण अधिकारी बापू दासरी यांनी केले आहे. 
यावेळी डॉ. लक्ष्मीकांत बजाज म्हणाले की बौद्धिक दिव्यांग विद्यार्थांसाठीच्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग निश्तित या दिव्यांग विद्यार्थाना होणार आहे. विशेष शिक्षकासह पालकांनीही आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी परिश्रम घेणे गरजेचे आहे. अधिव्याख्याता ज्ञानेश्वर सावंत म्हणाले की २१ दिव्यांग  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गरजेनुसार साहित्य वितरण करण्यात येते.  यापूर्वी बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात येत नव्हते आता वयोगटानुसार शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. या साहित्याचा शिक्षकांनी अध्यापनात प्रभावीपने उपयोग केल्यास शासनाचे अपेक्षित ध्येय पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. मुख्याध्यापक नितीन निर्मल म्हणाले की गत महिन्यात येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील कर्णबधीर, गतीमंद, अस्थिव्यंग व अंध या चारही प्रवर्गातील शाळेच्या विद्यार्थ्यांना गरजेनुसार आवश्यक संसाधने देण्यासाठी मोजमाप घेण्यात आले होते. यासाठी निवड झालेल्या १ हजार ४५६ विद्यार्थांना लवकरच गरजेनुसार आवश्यक साहित्य वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. सहायक अधिव्याख्याता मुदगडे यांनी टी.एल.एम. किट चा बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचलन मुरलीधर गोडबोले तर उपस्थितांचे आभार मनुरकर यांनी मानले. यावेळी ५४ विद्यार्थ्यांना  कीट चे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या