जागर स्त्री शक्तीचा , घर बंदुक बिर्याणी चित्रपट प्रमोशन कार्यक्रम अलोट उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/03/2023 8:01 AM

#घर_बंदूक_बिर्याणी
#जागर_स्त्री_शक्तीचा
#प्रचंडऊर्जा_उत्साहाचा_अलोटगर्दीचा_प्रेमाचा_दिवस 

काल घर बंदूक बिर्याणी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने घर बंदूक बिर्याणी चे संपूर्ण कलाकार टीम  आणि त्या टीम सोबत महाराष्ट्राच्या चित्रजगतावरती आपला ठसा उमटवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे जी, सैराट चित्रपटाचा नायक अभिनेता आकाश ठोसर, झुंड चित्रपटाची नायिका अभिनेत्री सायली पाटील , झी स्टुडिओचे हेड अश्विन सर, मंगेश सर हे उपस्थित होते. त्याचवेळेस प्रभागातील नागरिकांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्त जागर स्त्री शक्तीचा हा सांगलीच्या मातीतील सुमित साळुंखे, अनुराधा गव्हाणे साळुंखे यांनी दिग्दर्शीत केलेला कार्यक्रम झाला. एकूण काल संध्याकाळी या सर्वासोबत सर्वांनीच धमाल केली. नागराज मंजुळे सरांचे विशेष कौतुक.. कारण या सगळ्या चकचकित चंदेरी दुनियेच्या आभासी जगतात खऱ्या खुऱ्या सामान्य माणसांचं जिणं पडद्यावर साकारणारा हा दिग्दर्शक नव्हे तर सिने जगताला नव्याने मांडणारा दिशादर्शक खरा.. समाजातल्या शेवटच्या माणसाचं जगणं, व्यवस्थेत त्याचं असणार स्थान आणि त्याच व्यवस्थेच्या पेकाटात घातलेली लाथ या संपूर्ण बंडखोरीला स्वतः जगणारा, आणि स्वतःच्या कवितेत साहित्यात घेणारा आणि तेच पडद्यावर उभं करणारा हा चंदेरी दुनियेतला बंडखोर अवलिया.
      एकंदरीत दुपारीच हे सगळे कलाकार आल्यापासून मग ते नागराज मंजुळे सर असो किंवा आकाश ठोसर किंवा सायली पाटील...हे सारेच त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा करताना, किंवा अगदी साधेपणाने आमच्यासोबत जेवत संवाद साधताना, कार्यक्रम ठिकाणी सर्वसामान्यांना उतरून फोटो देताना,कार्यक्रम स्थळी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देताना स्वतःच्या पायातली चप्पल दूर करून ती मूर्ती स्वीकारताना आणि कार्यक्रम संपल्यावर आण्णा भाऊंच्या पुतळ्यास स्वतः जाऊन हार घालताना,त्यानंतर एकत्र येऊन क्रिकेट खेळताना कुठेही आपण विशेष आहोत असा कोणताही भाव न बाळगता तळातल्या माणसांशी सुद्धा आपलेपणा जपणारी ही माणसं. एकूणच कालचा दिवसच एका वेगळ्या पद्धतीने जगता आला.. यासाठी विज्ञान माने, धनंजय वाघ, विजय खेत्रे यांच्या संपूर्ण विशेष प्रयत्न व सहकार्यातून आणि सोमनाथ भोसले,गोपी जाधव,चंदू पडसलगी, अविनाश साळुंखे, सुरेश जगदाळे, गणेश तेली, माणिक पाटील, दिलीप गवंडी, विनायक माळी,गणेश तोळे, सचिन हनमाने, अक्षय खराडे ,महेश तोळे,बाजीराव भोसले, महेश ऐवले यासोबत माझ्या संपूर्ण मित्र परिवाराने मेहनत घेतल्याने कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आमच्या नेत्या जयश्री वहिनीसाहेब पाटील या उपस्थित होत्या, आणि माझ्या सहकारी नगरसेविका स्नेहल ताई सावंत, नसीमा ताई नाईक याही उपस्थित होत्या. जवळपास 2000 च्या आसपास नागरिक बंधू भगिनींनी उपस्थिती दर्शवली होती.
    एकूणच असं म्हणता येईल कालचा दिवस सर्वासाठीच विशेष नवलाई आणि उत्साहाचा होता, चंदेरी दुनियेशी तळातल्या मातीला जोडणारा होता, चकाकत असताना सुद्धा सामान्य माणसाला चकचकीत न वाटता आपला वाटणारा होता आणि हा दिवस म्हणजे सगळ्याच टीम साठी प्रचंड ऊर्जा उत्साहाचा अलोट गर्दीचा निर्मळ प्रेमाचा हा दिवस होता.

Share

Other News

ताज्या बातम्या