ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नाशिक रोड धान्य वितरण कार्यालय नाशिक .रोड येथून स्थलांतरित करू नये :-भाजप रिपाईची मागणी..*


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 2/1/2023 8:51:08 PM


*नाशिक रोड धान्य वितरण कार्यालय नाशिक .रोड येथून स्थलांतरित करू नये :-भाजप रिपाईची मागणी..*

देवळाली कॅम्प  (प्रतिनिधी) आज दिनांक 1/2/2023 बुधवार रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा मंडल  व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल उपायुक्त श्री.संजय काटकर साहेब यांना रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे भगूर देवळाली मंडल अध्यक्ष विशालभाऊ साळवे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले..!

निवेदनाचा आशय असा आहे की ना.रोड येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या अधिन असलेल्या  नाशिक शहरी भागात एकुण 230 रास्त भाव दुकाने कार्यरत असून सदर कार्यालयाच्या क्षेत्रात ना.रोड देवळाली कॅम्प भगूर जेलरोड उपनगर गांधीनगर आगर टाकळी सुभाष रोड देवळाली गावं शिंगवे बहुला गुलाब वाडी चेहडी शिव सामना गावं रोड विहीतगाव मळे परिसर सिन्नर फाटा गोरेवाडी आदी स्लम् भागाचा समावेश आहे तसेच शासनाच्या नवीन नियमानुसार ना.रोड भागातील दसक पंचक शिंदे पळसे एकलहरे संसरी बेलतगव्हान  आदी भागातील एकुण 60 रास्त भाव दुकाने धान्य वितरण अधिकारी कार्यालयात जोडण्यात येणार आहे यापुर्वी धान्य वितरण अधिकारी कार्यालय हे माननीय जिल्हाधिकारी नाशिक कार्यालयाच्या आवारात होते परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात  जागा नसल्याने सदर कार्यालय नियमित दर दोन ते तीन वर्षाने स्थलांतरित करावे लागत  असल्याने खासदार यांनी ना.रोड येथील सरकार ची असलेली प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली असे असताना देखील सदरचे कार्यालय हे नाशिक येथे स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे असे होऊ नये म्हणून आज महसूल उपायुक्त साहेब यांची भेट घेतली व साहेबांनी निवदेनाची दखल घेऊन वरीष्ठ अधिकारी यांना कळविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे..!

याप्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, भाजप भगूर देवळाली अनु.सुचित जाती मोर्चाचे मंडल अध्यक्ष विशालभाऊ साळवे,रिपाई ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गवारे,रिपाई ना.रोड उपाध्यक्ष शरद गायकवाड,रिपाई जिल्हा सचिव सागर आण्णा शिरसाठ,रिपाई नेते मिलिंद भाई निकम सामाजिक कार्यकर्ते ,डि.एस.आंबीलकर, सामाजिक कार्यकर्त्या आरतीताई जाधव, भाजपा युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
===================
नाशिक स्टार न्युजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे भगुर देवलाली कॅम्प

Share

Other News