नांदेड कौठा येथे 26 जानेवारीला सामुदायिक उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 24/01/2023 2:27 PM

नांदेड :- नांदेड येथील कौठा परिसरात असलेल्या प.पू. डाॅ.रामचंद्र महाराज पारनेरकर जीवन कला मंदिरात 26 जानेवारी रोजी  होणार्‍या सामुहिक व्रतबंध सोहळयाचे आयोजन करण्यात आले आसल्याचे या समीतीचे अध्यक्ष श्री नारायणराव तुप्पेकर यांनी दिली आहे.प.पू.डॉ.श्री विष्णू महाराज पारनेरकर यांच्या कृपा आर्शीवादाने व श्री गुणेशदादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शना खाली होणार्‍या व्रतबंध सोहळयात एकूण 9 बटू वर उपनयन संस्कार केले जाणार आहेत.
हा कार्यक्रम दि 26 जानेवारी 2023 रोजी दुपारी ठिक 12.30 वाजता आसुन या सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर.माजी मंत्री डि.पी.सावंत.आमदार अमरभाऊ राजुरकर.भाजपा महानगर अध्यक्ष प्रविण साले.अँड चैतन्य बापू देशमुख व समाजाचे नेते निखिल लातूरकर नांदेड तहसिलदार किरण अंबेकर,शिक्षणधिकारी प्रशांत दिग्रसकर व ब्राह्मण समाजातील आनेकजन या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहेत.
 “उपनयन” हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यावर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत(जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटुला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे. श्री गुणेशदादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 13 वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन होत आसते याही वर्षी या होणार्‍या व्रतबंध सोहळयात एकूण 9 बटू वर उपनयन संस्कार केले जाणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  नारायणराव तुप्पेकर, देवेद्र पवार, सत्यजीत तोष्णीवाल, शरदराव तामसेकर, नितीन राहेगावकर, श्रीनाथ धोकटे, रवि मुळे, श्रीकांत वैद्य आदि परिश्रम घेत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या