सावरकर जयंतीनिमित्त सायकल प्रवासाद्वारे पर्यावरण व देशभक्तीचा संदेश

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 22/05/2022 4:23 PM

सावरकर जयंतीनिमित्त सायकल प्रवासाद्वारे पर्यावरण व देशभक्तीचा संदेश

दिनांक 28 मे रोजी भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या 139 व्या जयंती निमित्त भगूर येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक कै. रघुनाथराव सखाराम कुवर यांचे पणतू अर्णव गणेश कुवर हा 11 वर्षांचा राष्ट्रभक्त विद्यार्थी पर्यावरण व देशभक्ती यांची अनोखी सांगड घालून 139 किलोमीटरचा सायकल प्रवास करून स्वातंत्र्यवीरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करत आहे. 

 अर्णव हा शनिवार 28 तारखेला सायकलने सकाळी 6 वाजता सावरकर वाडा, भगूर येथून प्रस्थान करेल. त्यानंतर नाशिक येथील सावरकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले अभिनव भारत मंदिर येथे नतमस्तक होऊन तेथून सावरकरांचे आजोळ असलेले निफाड तालुक्यातील कोठुरे गाव येथे भेट देऊन निफाडमार्गे नाशिकला परतणार आहे. परतीच्या मार्गावर पंचवटी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात वंदन करून पुन्हा भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे प्रवासाचा समारोप करेल. 

असा 139 किलोमीटरचा प्रवास रणरणत्या उन्हात नॉन गियर सायकलने 10 तासात पूर्ण करण्याचा त्याचा मानस आहे.

देशभक्ती, समाजसेवा आणि कुंवर कुटुंब हे एक अलिखित समीकरण आहे. दुसऱ्या पिढीतील देविदास कुंवर यांनी नोकरी सांभाळून सतत सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. तिसऱ्या पिढीतील गणेश कुवर हे एकाच वर्षात 6 वेळा SR ही सायकल विश्वातील मनाची पदवी मिळवणारे नाशिकचे एकमेव सायकलिस्ट आहे. व्यायामासोबत पर्यावरण संवर्धन चा मोलाचा संदेश देत अजूनही ते नवनवीन विक्रमांना गवसणी घालत आहे. त्यांचाच धाकटा भाऊ दत्ता हा सतत समाज उपयोगी कामात व्यग्र आहे. ह्या दोघा भावांची पुढची पिढी आपल्या पूर्वजांची शिकवण आचरणात आणत आहे. अर्णव हा कुवर परिवारातील चौथ्या पिढीचा सदस्य असून तो पणजोबांनी दाखविलेल्या देशभक्तीच्या मार्गाने आजही मार्गक्रमण करीत आहे.
      अशा या सामाजिक संदेश घेऊन सायकल प्रवासास निघणाऱ्या अर्णवचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सर्व सावरकर प्रेमींनी वरील नमूद केलेल्या सायकल प्रवासादरम्यान जेथे शक्य असेल तेथे तेथे उपस्थित राहून त्याचे स्वागत करावे, ही विनंती.
- भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नाशिक
सायकल प्रवासाचे वेळापत्रक
1. सावरकर स्मारक भगूर सकाळी 6.00  वा.
2. अभिनव भारत मंदिर, नाशिक सकाळी 7.30 वा.
3. कोठुरे निफाड सकाळी 10.00 वा.
4. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निफाड सकाळी 11.30 वा.
5.स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक पंचवटी, नाशिक दुपारी 2.30 वा.
6.छत्रपती शिवाजी महाराज चौक भगूर दुपारी 4.00 वा.

Share

Other News

ताज्या बातम्या