पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती नियोजन बैठक महापौरांच्या उपस्थीतीत मनपामध्ये संपन्न...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/05/2022 12:33 PM


   पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमीत्त नियोजन बैठक आज सांगली मिरज आणि कुपावाड महानगरपालिका सांगली कार्यालय येथे संपन्न  झाली.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका वॉर्ड क्र. ८ मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे दि. ३१/०५/२०२२ रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करणेत येणार आहे. त्या अनुषंगाने जयंती निमीत्त महापौरांच्या
 उपस्थीतीत नियोजन बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीमध्ये जयंती निमीत्त स्मारकास विदयुत रोषणाई, मंडप उभारणे, वकृत्व स्पर्धा, व्याख्याने घेणेबाबत चर्चा झाली. तसेच दि. ३१/०५/२०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळयास पुष्पहार अर्पण व अभिवादन करणेत येणार आहे. 

या  नियोजन बैठकीस मा. संजिव ओहळ उप-आयुक्त (मिरज), मा. विनायक सिंहासने भाजपा गट नेते, मा. विष्णू माने सदस्य, मा. सौ.संगिता खोत, मा.सौ.कल्पना कोळेकर, मा. राजेंद्र कुंभार, मा.सौसविता मदने, मा. विठलराव खोत, मा. जेलर आरोग्य विभाग उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या