ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

राजे दहेगाव येथे शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 5/13/2022 9:39:43 PM


रोहित बोंबार्डे
तुमसर भंडारा, दि. 13 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत भंडारा तालुक्यातील दहेगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेत सेमीइंग्रजी माध्यमांसाठी वर्ग सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, विद्यार्थी संचयी नोंदपत्रक, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक आवश्यक आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 15 जून 2022 असून ज्या विद्यार्थिनींना शासकीय निवासी शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी अर्ज प्राप्त करून वेळेत सादर करावा, असे आवाहन मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे यांनी केले आहे.

Share

Other News