ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

शहरे सुरक्षित करण्यासाठी 'ईज ऑफ लिव्हिंग'चा पर्याय स्वीकारण्याची गरज


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 1/21/2022 10:58:05 PM 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारलेला 'व्हाट्सऍप चॅट बॉट' उपक्रम इतर महापालिकांमध्ये राबविण्यासाठी शासन सकारात्मक

 

            मुंबई, दि.21 :- शहरातील सुरक्षितता वाढवण्यासाठी 'ईज ऑफ लिव्हिंग' उपक्रमात सुचवण्यात आलेले उपाय राज्यातील सर्व महानगरपालिकामध्ये राबवण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. हे उपाय शहरांचे रूप पालटून टाकण्यासाठी अत्यंत आवश्यक असून त्यासाठी गरज वाटल्यास या महानगरपालिकांना नगरविकास विभागाच्या वतीने आर्थिक मदत देण्याची तयारीही  त्यांनी दर्शवली.

            नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने व्हाट्सऍप चॅट बॉट आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे सुरक्षित शाळा उपक्रमांचे ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            आठ दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्हाट्सएप चॅट बॉट या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या नवीन सुविधेमार्फत तब्बल 80 सुविधा चॅट बॉटच्या माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेला हा प्रकल्प इतर महानगरपालिकांनी देखील राबवावा यासाठी आज या सुविधेचे सादरीकरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

            

Share

Other News