ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नक्षल्याकडुन १२ वाहनांची जाळपोळ


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 1/21/2022 10:47:47 PM


 प्रतिनिधी / प्रशांत पेदापल्लीवार
भामरागड : तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्राअंतर्गत इरपणार येथे रस्त्याच्या कामावर असलेल्या वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून सदर घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे . 
सविस्तर वृत्त असे कि तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या  इरपणार येथे पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याच्या बांधकाम सुरु होते आज दुपारी २ वाजताच्या सुमारास काही गणवेश धारी नक्षल्यांनी सदर रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली असून यात ९ ट्रॅक्टर , २ जेसिबी , १ ग्रेडर चा समावेश असून सुमारे दीड कोटी रुपयांचा वाहनांना नक्षल्यांनी पेटवून दिले आहे यामुळे परिसरातील रस्ता , पुलाच्या बांधकामावर परिणाम होणार आहे तसेच अनेक दिवसांनी नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे .  .

Share

Other News