*चंद्रपूर जिल्ह्यातील सात पैकी सहा नगरपंचायतीत काँगेसचा झेंडा* *वडेट्टीवार यांच्या मतदार संघातील सावली व सिंदेवाहीत काँग्रेसची एकहाती सत्ता* *संकटावर मात करून राज्य सरकारच्या कामगिरीला मतदारांची पसंती - मा. ना. श्री. विजयभाऊ वड़ेट्टीवार*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 19/01/2022 7:34 PM

🔳 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दमदार कामगिरीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सात पैकी सहा नगरपंचायतीत काँगेसचा झेंडा*

🔳 वडेट्टीवार यांच्या मतदार संघातील सावली व सिंदेवाहीत काँग्रेसची एकहाती सत्ता*

🔳 संकटावर मात करून राज्य सरकारच्या कामगिरीला मतदारांची पसंती - मा. ना. श्री. विजयभाऊ वड़ेट्टीवार*

 चंद्रपूर : जिल्ह्यातील 6 नगर पंचायत पैकी 4 मध्ये कांग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून 1 नगर पंचायत त्रिशंकू असली तरी त्या ठिकाणी सुध्दा काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याने जिल्ह्यात 5 ठिकाणी काँग्रेसची सत्ता बसनांर आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही व सावली येथे वडेट्टीवार यांनी विरोधकांना धूळ चारत प्रत्येकी 17 पैकी 14 सदस्य निवडुन आणून एकहाती सत्ता प्राप्त करून जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे.
   या विजयावर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,  संपूर्ण राज्यात ओबीसी विषय घेवून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा, आम्ही ओबीसी करीता काही करत नाही ही भूमिका विरोधकांनी मांडली. आजचा निकाल हा त्याला चपराक देणारा आहे. ओबीसी बाबत महाविकास आघाडीचा निकाल बघितला तर कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेना मिळून सर्व जागांच्या अर्ध्यावर सुद्धा भाजपा नाही. भाजपाने ओबीसीचे जे नुकसान केले त्याचे उत्तर भाजपला मिळाले आहे. कारण आम्ही वारंवार म्हणत होतो की, केंद्र सरकारची भूमिका ही ओबीसीच्या राजकीय आरक्षणाविरोधात आहे आणि महाराष्ट्रात तर ती त्यांनी दाखवून दिली. कारण जेंव्हा मध्यप्रदेशचा विषय आला तेंव्हा मुदतवाढ पण महाराष्ट्रासाठी अजिबात मदत न केल्यामुळे त्यांना मतदारांनी नाकारले. 
        चंद्रपूरमध्ये माझ्या आणि आमदार श्री. सुभाष धोटे यांच्या मतदारसंघात कांग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विदर्भात सगळीकडे कांग्रेस असून विदर्भ हा सुरवातीपासुनाच कांग्रेसचा गढ राहिला आहे. संपूर्ण राज्याचे अजून निकाल यायचे आहे. भंडारा - गोंदिया जिल्हा परिषद मध्ये कांग्रेस सर्वात मोठा पक्ष राहील. भाजपा दोन्ही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहे. 
राज्यात महाविकास आघाडी भक्कम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. संपूर्ण 106 पैकी 80 जागांवर महाविकास आघाडीला सत्ता असेल. उर्वरित 26 जागांबद्दल सांगू शकत नाही. 
कोरोनाचे संकट, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, गारपीठ अशी अनेक संकटे राज्यावर येवून सुद्धा आणि केंद्र सरकारची कोणतीही मदत नसताना राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम सरकारने केले आहे. मतदारांनी राज्य सरकारच्या कामगिरी ला मत दिल्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या