*सामान्य वृध्द पुरुष व महीलेच्या हस्ते आठ कोटीचा कामाचे भूमिपूजन ; खा.धानोरकरांचा दिसला मोठेपणा* *प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मार्डा व नागडा रस्ता*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 24/11/2021 6:45 PM

*सामान्य वृध्द पुरुष व महीलेच्या हस्ते आठ कोटीचा कामाचे भूमिपूजन ; खा.धानोरकरांचा दिसला मोठेपणा*

*प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मार्डा व नागडा रस्ता*

चंद्रपूर : नखभर कामाची वितभर प्रसिद्धी करण्याचा आटापिटा नेत्यांचा असतो. याला चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर अपवाद ठरले आहे. एका सामान्य वृध्द पुरुष व  महीलेचा हस्ते तब्बल आठ कोटींचा कामाचे भुमिपुजन उरकवून धानोरकरांनी मनाचा मोठेपणा दाखविला. ग्रामीण भागातील शेतमाल शहरात येण्याकरिता दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात निर्माण होण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मार्डा व नागडा रस्ता बांधकामाकरिता ८ कोटी २४ लाख ५७ हजार निधी मंजूर केला. आज भूमिपूजन करताना त्यांनी गावातील वृद्धांच्या हस्ते भूमिपूजन केले. पाच दहा लाखांचा कामाचे भुमी पुजन कारतांना नेते बँनरबाजीची स्पर्धा करतात. अश्यात एका सामान्य पुरुष व महिलेच्या हातून कामाचे भूमिपूजन झाल्याने खासदार बाळू धानोरकर यांची चर्चा होते आहे.


                                        यावेळी  आमदार किशोर जोरगेवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी, सरपंच प्रतिभा प्रकाश अल्वलवार, उपसरपंच राजकुमार विठोबा नागपुरे, मधुकर टोंगे, सदस्य सध्या पिंपळशेंडे, मनीषा देवालकर, कार्यकारी अभियंता पियुष लोखंडे, उपअभियंता केशव राजगडकर, संगीत अमृतकर, संतोष लहामनगे, अस्विनी खोब्रागडे, हर्षा चांदेकर, स्वाती त्रिवेदी, गोपाल अमृतकर, नरेंद्र बोबडे, शामकांत थेरे, अनिस राजा, पप्पू सिद्धीकी, बापू अन्सारी, राजेश अडूर यांची उपस्थिती होती. 

                                       प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील प्रजिमा ४१ (पिप्री ) ते प्रजीम ४१ मार्डा रस्ता, लांबी ८. ७८ किमी व करारनामा किंमत ४३६. ५८ लक्ष तसेच प्रजीम ११ नागाडा ते रामा ३७३ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकर कामाला ३८७.९९ इतका निधी प्राप्त झाला आहे. आज या दोन्ही रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.    


याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वदूर रस्त्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते गुळगुळीत होत नागरिकांना सुविधा मिळावी, या उद्देशाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पुढे देखील ग्रामीण भागात दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात निर्माण होण्यासाठी अशा प्रकारे रस्ते बांधण्यात येणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपले मत व्यक्त केले.

Share

Other News

ताज्या बातम्या